ताज्या घडामोडी

15 सट्टा शौकिनांवर पोलिसांची कारवाई

४ लाख ४८ हजार ३३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

राजेंद्र मर्दाने वरोरा

नव्यानेच रुजु झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन ह्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सक्त सूचना दिल्या असल्याने जिल्हाभर विविध कारवाया सुरू असुन सध्या अवैध सुगंधी तंबाखूवर कठोर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तंबाखू व्यवसायी लवकरच ह्यात सुट मिळेल व आपले अवैध व्यापार सुरू होतील ह्या आशेने असतानाच वरोरा पोलिसांनी सट्टापट्टी विरोधात कारवाई सुरू केली असल्याचे आढळुन आले असुन पोलिसांनी घातलेल्या धाडीत तब्बल 15 जुगाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील टेमुर्डा गावालगतच्या झुडूपात सट्टापट्टीवर जुगार खेळला जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून धाड घातली. या प्रकरणात पंधरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. टेमुर्डा गावामागील झुडपी परिसरात सट्टापट्टीवर जुगार खेळला जात असल्याची माहिती वरोरा पोलिसांना १ मार्च रोजी मिळाली होती. पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. तेव्हा १६ व्यक्ती सट्टापट्टीवर जुगार खेळत असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरून ११ दुचाकी, मोबाइल, रोख २५ हजार असा एकूण ४ लाख ४८ हजार ३३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात एपीआय योगेद्रसिंग यादव, पोहवा दिलीप सुर, मोहन निशाद, शशांक बदामवार, फुलचंद लोधी यांच्या पथकाने केली केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये