ताज्या घडामोडी

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चिमूर /गडचिरोली लोकसभा /विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागभीड तहसील अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील मतदान केंद्रावर नैतिक मतदानाच्या मोहिमेकारिता मतदार जागृती गट, स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मतदारात जाणीव निर्माण करणे, मतदारांना निर्भय व निपक्ष पद्धतीने मतदान करता यावे यासाठी त्यांची क्षमता बांधणी करणे. त्यांच्या उपस्थितीत आपली मतदार यादी परिसरात कॉर्नर बैठाका आयोजित करणे.

मतदारांना निवडणूक काळात आमिष सदृश्य वस्तू, स्वीकृत न करणे याबाबत माहिती देणे ज्यायोगे क्षेत्रातील मतदार नैतिक मतदानासाठी अभिप्रेरित होतील अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे “मतदान केंद्रास्तरीय अधिकारी (बी.एल.ओ)ना बंधनकारक करण्यात आले असल्याचे सहा मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार नागभीड यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिद्दी पत्रकाने जाहीर करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये