ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती वनविभागाच्या भांडारगृहाला आग

किरकोळ स्वरूपाचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

  भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या भंडारगृहाला आग लागली. मात्र ही आग वेळीच लक्षात आल्याने व त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात आल्याने आगीत केवळ किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले.

सदर घटना दिनांक 12 रोज शनिवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात घडली. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. सदर आग ही शार्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. आज सकाळी काही वनमजूर सदर भांडारगृहाकडे कामानिमित्त गेले असता त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. या वनमजुरांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती नगर परिषदेच्या अग्निशामन विभागाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी लगेच अग्निशामन गाडी पाठवून आज पूर्णतः विझवली. या घटनेत किरकोळ नुकसान वगळता फार मोठे नुकसान झालेले नाही. घटनास्थळाची पाहणी वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्यातर्फे करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये