ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील विकास कामे मंजूर करून निधी उपलब्ध करा

माजी नगराध्यक्ष नामोजवार यांचे आमदार तथा पालकमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      भद्रावती शहराला पर्यटन शहर म्हणून राज्य शासनाने घोषित केले आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस शहरात वाढत चाललेला आहे. मात्र शहरातील अनेक ऐतिहासिक स्थळांचा अध्यापही विकास झालेला नाही.त्यामुळे विविध विकास कामांना मंजुरी देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा सचिव सुनील नामोजवार यांनी आमदार करण देवतळे तथा पालकमंत्री अशोक उईके यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.

गांधी चौक ते बुद्ध लेणी, बुद्ध लेणी ते भवानी माता टेकडी, जैन मंदिर गेट ते जैन मंदिर, जामा मज्जिद ते दुधाळा तलावापर्यंत ओक्टागोलन पोल उभे करून स्ट्रिट लाईट लावणे, बजरंग चौक व बुद्ध लेणी चौकाचे सौदरीकरण करणे, जामा मजीद ते बालाजी मंदिरापर्यंत काँक्रेट रस्ता तयार करणे व दुधाळा तलावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेवर ब्लॉक बसवणे इत्यादी कामे मंजूर करून या कामांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये