ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहननाथमहाराज चे केले अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गोरखनाथपीठाचे महंत तथा उ.प्र.चे मुख्यमंत्री पूज्यश्री योगी आदित्यनाथजी यांनी श्रीसंत नरहरिनाथमहाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त पूज्यश्री मोहननाथमहाराज पैठणकर यांना शुभेच्छा पत्र पाठऊन अभिनंदन केले आहे.

20 ते 27 फेब्रुवारी दरम्यान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती निमित्त श्री संत नरहरी नाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा पारायण सोहळा व भव्य नाम संकीर्तन महोत्सव चे यशस्वी रित्या आयोजन पूज्य श्री मोहंननाथ महाराज पैठणकर यांनी केले होते, या महोत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये