ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे अपघात विमा क्लेम रकमेचे वाटप

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत पगार होणारे जिल्हयातील १२६५४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सीडीसीसी बँक सॅलरी पॅकेज अंतर्गत प्रत्येकी रु. ३०.०० लाख चा अपघात विमा बॅकेतर्फे काढण्यांत आलेला आहे.

भद्रावती शाखेअंतर्गत पगार घेणारे धमाबाई प्राथमिक आश्रमशाळा बरांज तांडा येथील शिक्षक श्री. सुनिल गोविंदराव बरडे यांचा दि. १२.१०.२०२३ रोजी दुर्दैवाने अपघाती मृत्यु झाला. बॅकेचे सीडीसीसी बॅक सॅलरी पॅकेज अंतर्गत बॅकेच्या प्रमुख कार्यालयांत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते सुनिल गोविंदराव बरडे यांची वारस पत्नी श्रीमती वंदना सुनिल बरडे यांना रु. ३०.०० लाख विमा क्लेम रक्कम अदा करण्यांत आली.

यावेळी बॅकेचे संचालक सर्वश्री. संदिप गड्डमवार, डॉ. विजय देवतळे राजेश रघाताटे, पांडुरंग जाधव,  प्रकाश बन्सोड, विजय बावणे, मुख्य कार्यकारी अधिकारी  आर. बी. कल्याणकर व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये