ताज्या घडामोडी

सिखो इंडिया उत्सवांतर्गत येल्लापूर खुर्द येथे विद्यार्थी प्रदर्शनी

चिमुकल्यांनी केले भाषा आणि गणित विषयांचे मॉडेल

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

जिवती तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा, येल्लापूर खुर्द येथे सीखे इंडिया अंतर्गत असलेल्या TIP कार्यक्रम प्रदर्शन आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विशाल मेश्राम सरपंच माधव राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शा.व्य. स. च्या अध्यक्षा, वर्षाताई मेश्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणिताचे व भाषा विषयाचे वेगवेगळे मॉडेल, चार्ट, ठेवले होते. यावेळेस पालकांनी उत्साहाने आणि उत्सुकतेने विद्यार्थ्यांना प्रश्नही विचारले.

मागील दोन वर्षापासून जिवती तालुक्यात टीचर इनोव्हेटर कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना भाषा आणि गणित विषयाच्या विविध पद्धतींचे सिखे संस्थेमार्फत प्रशिक्षण दिल्या जाते. आणि त्यानंतर वर्षभर या शिक्षकांना कोचिंग केले जाते. विद्यार्थी या सर्व पद्धतीचा सराव त्यांना दिलेल्या कार्यपुस्तिकेत करत असतात. वर्षाच्या शेवटच्या सत्रात शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या या पद्धतींचे वेगवेगळे मॉडेल बनवून प्रदर्शित करतात. या कार्यक्रमात 72 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विशाल मेश्राम, वर्षा मेश्राम आणि सिखे संस्थेचे कोच मोहन चुक्काबोटलावांर, सोमेश पेंदाम ह्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये