ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

25 फेब्रुवारीला नागपुरात राज्यस्तरीय काव्य संमेलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

मराठी साहित्य मंडळ एक प्रख्यात नाव, जे फक्त महाराष्ट्रा पुरतं मर्यादीत न राहता संपूर्ण भारतात तर कार्यरत आहेच पण, साता समुद्रापार कॅलिफोर्नियात पोहोचलेच नाही तर तिथेही मंडळ कार्यरत आहे. अशा या मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री.सिध्दार्थ कुलकर्णी यांनी सप्टेंबर मधील नागपूर येथील अभूतपूर्व प्रतिसादात यशस्वी झालेल्या साहित्य संमेलनात घोषित केल्या प्रमाणे येत्या रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता श्री भैय्याजी पांढरे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क हनुमान नगर नागपूर आणि मराठी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडा चौक नागपूर येथील महाविद्यालयात एक आणखी भव्य राज्य स्तरीय कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पारितोषिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय नेते आणि उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब करणार आहेत. तरी सर्व नागपूर आणि विदर्भ वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आणि एका सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जयप्रकाश घुमटकर आणि विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष श्री सिध्दार्थ कुलकर्णी यांनी केले आहे.

     तसेच या अभूतपूर्व भव्यदिव्य सोहळ्यात सौ. प्रणाली चव्हाटे यांच्या “शब्दमाला” या काव्य संग्रह पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. चला तर मग रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून भैय्याजी पांढरे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क,हनुमान नगर,नागपूर येथे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये