राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास – प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधल्या जातो, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते असे प्रतिपादन शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांनी केले
जिल्हा स्मार्ट ग्राम बीबी येथे शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच पार पडले सदर शिबिर युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या संकल्पनेवर आधारित होते या शिबिरात पर्यावरण, स्वच्छता , आरोग्य,मतदार जनजागृती आदी विषयावर विविध उपक्रम राबवण्यात आले
शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बीबी ग्रामपंचायत च्या सरपंच सौ माधुरी ताई टेकाम,
डॉ संजय गोरे व्यवस्थापन परिषद सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, बापूजी पिंपळकर, उत्तमराव काळे,
शेख रशीद भाई, शेख रज्जाक भाई, रामदास देरकर , डॉ. हेमचंद दूध गवळी , अतकरे,आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी डॉ. संजय गोरे , बापूजी पिंपळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . सदर शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या शिबिरात विशेष उपक्रम म्हणून बांबू क्राफ्ट चे प्रशिक्षण प्रशिक्षक राजू राणे यांनी शिबिरार्थ्यांना दिले. बौद्धिक सत्रात वरून सिंह राजपूत ,सुरक्षा अधिकारी अल्ट्राटेक सिमेंट आवारपुर, प्रा.गुरुदास बल्की, जितेंद्र बैस, रवी मडावी अंबुजा सिमेंट उपरवाही, डॉ. के .आर .भोयर यांनी मार्गदर्शन केले तसेच पशु चिकित्सा शिबिर, होमिओपॅथी शिबिर, शुगर ,बीपी ,रक्तगट तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा उपक्रमाचे आयोजन शिबिरात करण्यात आले . ज्येष्ठ नागरिकांना बाळासाहेब मोहितकर, विठ्ठलराव थिपे यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शरद बेलोरकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी यांनी केले सदर कार्यक्रमात मतदार जनजागृती उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पोस्टर व रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील करण्यात आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते. तसेच शिबिरार्थी व विद्यापीठ आपल्या गावी उपक्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. माया मसराम, प्रा. मंगेश करंबे, सुरेश चांदेकर, तानाजी बुरान, बीबी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बीबी चे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, व शिबिरार्थी यांनी सहकार्य केले.