ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवजयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर शहर जिल्हाच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन

चांदा ब्लास्ट

 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य स्वराज्य सप्ताह म्हणून चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनेक प्रोग्राम घेण्यात आले फोन शिवराज्य सप्ताहाच्या उद्देशाने काल दिनांक 18/2/24 चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दत्तनगर ते शिवाजी चौक चंद्रपूर छत्रपती शिवाजी महाराजांची शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात आली सर्व प्रथम शोभा यात्रेमधील छत्रपती शिवरायांचे विधिवत पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डीजेवर महाराजांचे गीत लावून जल्लोषात बाईक रॅली ला सुरुवात झाली ह्या रॅली मध्ये महिला युवक युवती व जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला रॅली शिवाजी चौकात पोहोचल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्या नंतर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळाला मालारपन करण्यात आले.

चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी कडून आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, महिला निरीक्षक आभा देठें,महिला शहर जिल्हाध्यक्ष चारुशीला बारशाकडे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, महिला कार्याध्यक्ष हिमांगी बिस्वास, महासचिव संभाजी खेवले, शहर उपाध्यक्ष प्रमिला ताई बावणे,पंकज डेंगारे, किसनरावजी झाडे, कुमार पाल, विपिन झाडे, प्रवीण जुमडे,नंदकिशोर जोगी, प्रेमकांत तेंबूरकर, मनोज सोनी, राहुल वाघ केतन जोरगेवार,राम्पयरे शर्मा,मुड्डेवार साहेब तसेच अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते रेल्वेचे उत्तम आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे यांचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी कौतुक केले व रॅलीमध्ये सहभागी झालेल्यां सर्वांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये