ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात शिवजयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

              भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक,अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे, स्वराज्याचे निर्माते,छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

            कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार होते.विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक किशोर संगिडवार यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम, सहाय्यक शिक्षक,प्रकाश गेडाम,राहुल आदे,धनंजय गुरनुले उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या संचालन सहाय्यक शिक्षक प्रदीप कोहळे यांनी केले तर आभार शेखर प्यारमवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामचंद्र खिरटकर,दामोधर आदर्लावार सुरेंद्र डोहने इत्यादी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये