ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथील आनंदवनात 25 वर्षीय तरुणीची हत्या

फरार आरोपीवर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाबा आमटे यांचे कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेलं आनंदवन आश्रमात 25 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरती चंद्रवंशी असं मृत तरुणीचं नाव आहे. ही घटस्फोटित तरुणी कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पात पुनर्वसित दिव्यांगांच्या वसाहतीमध्ये आई-वडिलांसोबत वास्तव्याला होती.

तिचे वडील दिगंबर चंद्रवंशी दिव्यांग (अंध) असून गेल्या 40 वर्षांपासून ते आनंदवन येथे राहतात. 26 जून रोजी ते आपल्या पत्नीसह उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. काल रात्री उशिरा घरी आल्यावर त्यांना घराच्या बाथरूममध्ये आरतीचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळला. मृत तरुणीच्या गळ्यावर व मानेवर धारदार शास्त्राचे घाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये