राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठ क्रिकेट संघात निवड
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार
गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव या ठिकाणी घेण्यात आले होते यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून नावलौकिक केले.
गोंडवाना विद्यापीठ क्रिकेट संघाचे निवड करताना राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीचे खेळाडू विपुल बररेवार, अजिंक्य मडावी तेजस नन्नावरे या तिघांची गोंडवाना विद्यापीठाच्या संघात निवड झाली आंतर विद्यापीठ स्तरीय क्रिकेट सामने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव या ठिकाणी १८ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घेण्यात येत आहेत. गोंडवाना विद्यापीठ क्रिकेट संघात तीन खेळाडूंची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आले.
शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.भास्कर सुकारे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी खेळात उत्कृष्ट प्रदर्शन करीत विद्यापीठात निवड झाल्याबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार, उपाध्यक्ष अनिलजी स्वामी तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.खोब्रागडे,आणि महाविद्यालय समस्त कर्मचारी वृंदांनी निवड झालेल्या खेळाडूचे अभिनंदन केले आहे.