ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अभिनंदन – चंद्रपूर फार्मसिस्ट फोरमला प्रथम पुरस्कार प्राप्त

चांदा ब्लास्ट

दि. २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस चंद्रपूर फार्मासिस्ट फोरमच्या वतीने रेंजर कॉलेज इथे संपन्न झाला. Mspc ने उत्कृष्ट जागतिक औषधी दिन साजरा करणाऱ्या संस्थांना मा. आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून यांचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर फार्मासिस्ट फोरमला नागपूर झोन मधून मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट फार्मासिस्ट डे साजरा करण्यासाठी चंद्रपूर फार्मासिस्ट फोरमला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.

विजेत्त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देउन लवकरच विभागनिहाय सन्मानित करण्यात येईल असे चंद्रपूर फार्मासिस्ट फोरमचे अध्यक्ष गणेश झाडे, उपाध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले, सचिव पंकज देशमुख, सहसचिव तुषार सांबरे सर, सचिन खोब्रागडे, सागर मंडल, कोषाध्यक्ष रामटेके यांनी माहिती दिली आहे.

तर्फे सर्व फार्मासिस्ट फोरम टीमचे अभिनंदन…

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये