ताज्या घडामोडी

लहान सिलेंडर मधे गॅस भरत असताना लागली भिषण आग? दुकानदार होरपळला

भिषण आगीत दुकान भस्मसात - अनेकदा झाली होती गैरप्रकराची तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर, बल्लारपूर

बल्लारपूर आलापल्ली मार्गावरील रेल्वे चौक येथील दश्मिस गॅस शेगडी दुकानाला सायंकाळी सातचा सुमारास मोट्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस भरताना गॅस गळती झाल्याने आग लागली. आगीने रोद्र रूप घेतल्याने दुकान जळून खाक झाले, तर दुकान चालक अवतरसिंह दिग्वा होरपळले असुन त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. परिसरातील इतर दुकानदारांच्या सांगण्यानुसार ह्या दुकानात गॅस शेगडी विक्री सोबतच ट्रक चालकांना मोठया गॅस सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये अवैध रित्या स्वयंपाकाचा गॅस भरून विकल्या जात असल्याच्या तक्रारी होत्या. सदर दुकान असलेली इमारत रेल्वेच्या मालकीची आहे. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हे दुकान असूनही येथे अवैध रित्या गॅस भरून विकत असल्याने आजूबाजूच्या दुकानदारांनी संबंधित विभागाला अनेकदा तक्रार केली होती मात्र ह्या तक्रारींची दाखल घेण्यात आली नव्हती असेही दुकानदारांचे म्हणणे आहे.

अखेरीस लोकांची भीती दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात चा सुमारास खरी ठरली. सदर दुकानात गॅस भरत असतांना आग लागून दुकानात ठेवलेले गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन आगीने रोद्र रूप धारण केले. परिसरातील लोकांनी तत्काळ बल्लारपूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलास सूचित केले. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टाळला मात्र ह्या दरम्यान दुकान मालक दिग्वा होरपळल्या गेले. दुकानातील गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, सामान जळून खाक झाले. संबंधित दुकानाला लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे सांगितल्या जात असले तरी ही आग अवैधरीत्या मोठ्या सिलेंडर मधुन लहान सिलेंडर मधे गॅस भरताना आग लागली असल्याची शक्यता असल्याचे आजूबाजूच्या दुकानदारांचे म्हणणे आहे मात्र आगीचे खरे कारण चौकशीअंती कळू शकेल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये