ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधी सेवा प्राधिकरण कार्यक्रमात जि.प.शिक्षक गोविंद पेदेवाड यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ,मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती कोरपना द्वारा किमान समान कार्यक्रम अंतर्गत प्रतिभा प्राथमिक आश्रम शाळा धानोली, माध्यमिक आश्रम शाळा तथा शारदा कनिष्ठ महाविद्यालय धानोली येथे ३१ जानेवारीला कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

        या कायदेविषयक शिबिरामध्ये सह.दिवाणी न्यायाधीश कोरपना मा. ए. जे .पाटील यांनी विद्यार्थ्यांना अँटी रॅगिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा व राष्ट्रीय युवा दिवस यावर गोविंद पेदेवाड स. शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या समाजातील मुलींना फक्त वाचवलंच नाही पाहिजे तर तिला घडवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे . जर आपल्याला उद्याचे भविष्य चांगले घडवायचे असेल तर प्रत्येक स्त्रीच्या हातात ज्ञानाची धगधगती ज्योत देऊन तिला शिक्षित व प्रशिक्षित करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मा.भगवान पडवाले सह. फौजदार पोलीस स्टेशन कोरपना यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक चिन्ह आणि वाहन चालवताना करावयाच्या नियमाचे पालन या बाबत मार्गदर्शन केले.

         या कार्यक्रमाला मा. आर. आर.थोरात अध्यक्ष तालुका विधी सेवा सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश प्र. श्रेणी क स्तर कोरपना, मा. ए .जे. पाटील सह. दिवाणी न्यायाधीश कोरपना, ॲड. महेश धामोरीकर तालुका बार असोसिएशन, मा. सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक नागेश गंगशेट्टीवार, के. एस .पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गेडाम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये