ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेतीमाफिया विरुद्ध कारवाईचा बडगा – सामाजिक कार्यकर्ते भुतेकर भूमिगत

महसूल मंत्र्यांच्या कॅबिन समोर करणार आत्मदहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या बोटीद्वारे अवैधरीत्या सुरू असलेल्या रेतिउपस्या बाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे हप्त्याचा जाळ्यात अडकवून धरणा काठचे रस्ते खराब करण्यात या महसूल अधिकारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे चित्र रंगविण्यात आले.

इसरूळ मंगरूळ येथील संतोष भुतेकर यांनी वारंवार जिल्ह्यातील महसूल यंत्रणेला खडकपूर्णा धरणातून रोजनिशी होणारा बोटीद्वारे अवैध रेती उपसा आणि त्यातून बुलडाणा चिखली जालना या शहरासह जिल्ह्यात होणारी टिप्पर द्वारे वाहतूक त्यामुळे जी प,सार्वजनिक बांधकाम विभागाचे खराब होणारे रस्ते त्या खराब रस्त्यामुळे घडणारे अपघात जबाबदार धरत व्हिडीओ द्वारे सोशल मीडियावर अधिकाऱ्यांची तिसऱ्या पट्टीत कानउघाडणी केली तेंव्हा कोठे कारवाई चा बडगा हा टिप्परवर उगारून भली मोठी कारवाई केली असे भासविले मात्र वाहनावर कारवाई झाली बोटी ह्या मराठवाडयातील कुंभारझरी देउळ झरी, भोपळझरी,ब्रम्हपुरी शिवारात बोटी लपविल्या गेल्या, खरी कारवाई ही बोटीवर व्हायला हवी होती कारण स्थानिक पटवारी,कोतवाल, सरपंच तर काही ठिकाणी पोलीस सुद्धा अप्रत्यक्षपणे भागीदार होते तर या रेती तस्करी करणाऱ्यांची एवढी हिम्मत वाढली होती की रात्रगस्तीवर येणारी महिला नायब तहसीलदार (महसूल)हिस उडवून देण्यासाठी षड्यंत्र रचले होते मात्र एका दैनिका ने वृत्त प्रसिद्ध करून त्या महिला नायब तहसीलदार यांना अप्रत्यक्षपणे सूचित केले नाही तर त्या अधिकारी यांचा जीव गेला असता

 अद्यापही धरणातून बोटीद्वारे रेतिउपसा अवैधरीत्या सुरू असताना कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या गेले तेंव्हा उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड यांनी देऊळगाव राजाची टीम सोबत घेऊन धरणात चालणारी एक बोट नष्ट करण्यात आली विशेष म्हणजे पथकात काही कर्मचारी यांचे अवैध रेतीचोरीतअप्रत्यक्षपणे हात असल्याने कारवाई वेळेस त्यांची यंत्रणा अलर्ट राहते कारवाई होण्याअगोदर त्या द्रोह्यांच्या बोटी वाहने यंत्रसामग्री ही लपविल्या जाते कारवाई दुसरीकडे केली जाते.

थातुरमातुर कारवाई न करता बोटी कोणाजवळ आहे धरणातील बोटी संपूर्णतः नष्ट कराव्यात बोट चालक मालकावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशा बाबत महसूल प्रशासनास कळवून सुद्धा ज्याचा हुकला हप्ता त्यावर कारवाई चा बडगा अशीच पद्धत सुरू असून समाज सेवक संतोष भुतेकर हे मुंबई कडे जाणार असून ते सध्या भूमिगत झाले आहे आणि १३तारखेस महसूल मंत्री यांच्या कॅबिनसमोर आत्मदहन करणार असल्याचे भूतेकर यांनी दैनिक महाविदर्भ शी बोलताना सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये