ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयडीबीआय बँकेची लिंक पूर्वरत सुरू!

बँकेला कुलूप ठोकण्याचा ग्राहकांनी दिला होता इशारा ; परिसरातील जनतेने मानले "चांदा ब्लास्ट"चे आभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे याकरिता व्याहाड बुज.येथे आयडीबीआय बँकेची शाखा आहे. मात्र,सलग १५ दिवसापासून लिंक फेल असल्याचे कारण सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवायचे काम सुरु असल्याने ग्राहकात संताप निर्माण झाला होता.

       आर्थिक व्यवहार करण्याकरिता बँकेची गरज असून सर्व शासकीय आर्थिक व्यवहार बँकेमार्फत केल्या जातात. रोजगार हमी योजना, ग्रामीण भागात निराधार योजना, घरकुल योजना, पीएम किसान योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना, व इतर योजनेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने बँकेला फार महत्व आहे. व्याहाड बुज भागातील जनतेकरिता आयडीबीआय बँक ही एकमेव बँक आहे. मात्र, येथील अधिकारी कर्मचारी यांच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. मागील दोन आठवड्यापासून लिंक फेल कारणाने नवीन खाता उघडणे, खाता केवायसी करणे, बँलेन्स तपासणे या सारखे अनेक कामे बंद होती त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर ग्राहक संताप व्यक्त करीत होते व भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता परिसरात चर्चेला जात होती.

         सर्व मागण्याचे निवेदन देताना अनिल गुरूनुले, भाऊराव कोठारे,चेतन मोटघरे,सचिन इंगुलवार, सुनिल बोमनवार,अविनाश भुरसे, ऋषिकेश नगारे, दिपक गद्देवार,धनराज भांडेकर, डोमाजी शेंडे, मुन्ना भांडेकर, रुमाजी कोहळे, रोशन गुरुनुले, अरुण पाल, दिवाकर काचीनवार उपस्थितीत निवेदन दिल्यानंतर ही बातमी सर्वप्रथम ‘चांदा ब्लास्ट’ने प्रकाशित केल्याने सर्व निवेदकांनी “चांदा ब्लास्ट”चे आभार व्यक्त केले.

 “आयडीबीआय बँकेची लिंक तर सुरू झाली मात्र बँकच्या संदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्या प्रश्नावर उद्या किंवा परवा आम्ही परिसरातील सर्व जनता बँकेचे व्यवस्थापक यांचे सोबत चर्चा करणार आहोत. जर चर्चेतून प्रश्न सुटला नाही तर बँकेला निश्चितच टाळे ठोकू.”

              -अनिल गुरुनुले

 अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ सावली तालुका

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये