ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह अजितदादा गटाला मिळाल्यामुळे देऊळगाव राजा येथे कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 निवडणूक आयोगाच्या निकाल ने शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गट हिच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिला, तसेच पक्षाचे नाव,घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित दादा पवार च्या गटाला देण्यात आले.

या निर्णयामुळे देऊळगाव राजा बस स्टँड चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका व शहराच्या वतीने फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला खरी राष्ट्रवादी हे अजित दादा गटाला मिळाल्यामुळे देऊळगाव राजा शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला यावेळी तालुका व शहर राष्ट्रवादीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी दे.राजा तालुका अध्यक्ष राजीव शिरसाठ कार्याध्यक्ष सदाशिव मुंडे दे.राजा शहराध्यक्ष कवीश जिंतूरकर कार्याध्यक्ष कदीर भाई तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एल एम शिंगणे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिलीप झोटे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष खांडेभराड रंगनाथ पाटील कोल्हे गणेशराव बुरकुल रफिक पठाण, बंडू झोरे,शांतु भाग्यवंत महिला अध्यक्ष मंदाताई शिंगणे महिला शहराध्यक्ष रेखाताई पवार माजी नगरसेविका कठारे ताई नवनाथ घुमरे पंकज बैरागी अमीर खान पैलवान आमिर खान पैलवान अरविंद खांडेभराड सुनील शेजुळकर अशोक दादा पाटील राजेश पंडित तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते इत्यादी हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये