ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर महानगर येथे ‘नमो नवमतदार’ संमेलन

जनता महाविद्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शेकडोच्या संख्येमध्ये नवमतदार विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित

चांदा ब्लास्ट

देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो नवमतदार संमेलन संपूर्ण देशामध्ये ५००० पेक्षा अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यात चंद्रपूर महानगर येथे जनता महाविद्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे आणि भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आला.

यावेळी शेकडोच्या संख्येमध्ये नवमतदार विद्यार्थी व विद्यार्थिनी मोदिजिंचे संबोधन ऐकण्यासाठी जमा झाले होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवतोडे,माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,प्रज्वलंत कडू, प्रमोद क्षिरसागर, यश बांगडे, देवानंद वाढई, प्रदीप किरमे, विनोद शेरकी, रवी लोणकर, रवी जोगी, गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, मनीष पिपरे, पप्पू बोपचे, संजय पटले, राहुल पाल, स्नेहीत लांजेवार, कुणाल गुंडावार,महेश कोलावार,प्रवीण उरकुडे, प्रवीण गिलबिले, यश ठाकरे, मयूर चहारे, आकाश मस्के, अनुप शर्मा, ऐश्वर्य बांगडे, जयश्री आत्राम,आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये