Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

जिवाचे रान करून पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला

मोबदल्याचे 69 लाख शासनाकडे थकले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

          देऊळगाव राजा तालुक्यात मागील वर्षी अल्पवृष्टी झाल्यामुळे ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट ओढावले होते. पाणीटंचाईवर काहीशी मात करण्यासाठी शासनाने गावामध्ये किंवा इतर गावातील विहीर अधिग्रहण करून तर काही गावात टँकर सुरू करून ग्रामीण भागातील नागरिकांची तृषा भागवली होती. शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध पाण्यापैकी शेतीला न देता. शासनाने मागणी केलेल्या अल्प मोबदल्यात अधिग्रहणाला संमती दिली परंतु गेल्या आर्थिक वर्षांमध्ये 2023 -2024 शासनाकडे एकूण 69 लाख 41 हजार 400 रुपये थकलेले असल्यामुळे आम्ही शेतीला पाणी न देता गावकऱ्यांना पाणी पाजले काही चूक केली काय , असे म्हणत प्रशासनाविषयी रोष प्रकट करत आहे. सविस्तर वृत्त असे तालुक्यामध्ये 2022- 2023 या वर्षांमध्ये तालुक्यात पर्जन्यमान हे सरासरी पेक्षा कमी होते. साहजिकच पर्जन्यमान कमी झाले असल्यामुळे शेतकरी आपल्याकडे उपलब्ध असलेले पाणी काटकसर करून आपल्या पिकांना देऊन शक्य होईल तितका शेतीमाल आपल्या पदरी पडेल असे अपेक्षा करत असताना गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले. त्यामुळे शेताला पाणी देण्याचे बंद करून त्यांनी आपल्या विहिरीला उपलब्ध असलेले पाणी गावकऱ्यांना दिले. प्रतिदिन सहाशे रुपये मोफतला संबंधित विहीर धारकाला देण्याचे आदेश असताना. मागील आर्थिक वर्षात तालुक्यातील विहीर अधिग्रहण मालकाचे शासनाकडे 69 लाख 41 हजार 400 रुपये आज पर्यंत शासनाकडे थकलेले आहे. विहीर अधिग्रहण मालक पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयात आपल्या मोबदल्यासाठी चकरा मारताना दिसत आहे. आमचा पाठपुरावा चालू आहे एवढे साधक बाधक उत्तर संबंधित विहीर मालकांना देताना दिसत आहे. तालुक्यातील 82 विहीर मालकांचे अनुदान थकले. देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावातील दोन तर काही गावातील तीन विहिरी अधिग्रहण करून पाणीटंचाईच्या काळात तहान भागवली होती यामध्ये प्रामुख्याने जवळखेड वाणेगाव सिनगाव जहांगीर, अंभोरा, बोराखेडी बावरा, डोईफोडे वाडी, गिरोली बुद्रुक, उंबरखेड, गोळेगाव, अंढेरा, भिवगाव बुद्रुक, जुमडा, किनी पवार, चिंचखेड, टाकरखेड वायाळ, दिग्रस बुद्रुक, गारखेड, जांभोरा, सुलतानपूर, सावंगी टेकाळे, वाणेगाव, पळसखेड झाल्टा, मेंडगाव, खाल्याळगव्हाण, नारायण खेड, तुळजापूर , बायगाव बुद्रुक,गारगुंडी , सावखेड नागरे, सावखेड भोई, आधी गावांमधून एकूण 82 विहीर मालकांच्या विहीर अधिग्रहण करून टँकर साठी तर काही विहीर अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा नळ योजनेद्वारे करण्यात आला होता.

       माझ्याकडे उपलब्ध असलेल्या विहिरी मधून शासन आदेशाप्रमाणे 81 दिवस विहीर अधिग्रहण करून प्रतिदिन सहाशे रुपये प्रमाणे पाणीपुरवठा केला होता. वेळ अधिग्रहण केल्यानंतर माझ्या विहिरीमध्ये उपलब्ध असलेले पाणी मी शेतातील पिकांना न देता पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजेच अधिग्रणासाठी रिझर्व केले होते त्याचा मोबदला आतापर्यंत मिळाला नाही..

मल्लिकार्जुन लंगोटे. विहीर मालक सिनगाव जहांगीर

      पाणीटंचाई निवारणार्थ मागील वर्षांमध्ये आलेले अधिग्रहण प्रस्ताव तसेच टँकरचे प्रस्ताव यांना तात्काळ मंजुरात देण्यात आली होती. अशा प्रकारची दैनंदिनी आणि मासिक अहवाल आम्ही वेळोवेळी वरिष्ठांना सादर केलेला आहे. विहीर अधिग्रहण मालकांची फवारण्याच्या मागणीसाठी वारंवार कार्यालयाला कास्तकार चकरा मारत आहे .

त्या संदर्भात आमचा पाठपुरावा चालू असून शासनाकडून पैसे प्राप्त झाल्यानंतर तात्काळ संबधित विहीर मालकांना अदा करण्यात येईल.

व्ही. बी.सावळे पाणीटंचाई कक्ष प्रमुख पंचायत समिती देऊळगाव राजा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये