ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव मही नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी ने एका वृद्धास पाठीमागून जबर धडक दिली, यात वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 2 फेब्रुवारी ला घडली,भीमराव विठोबा शिंगणे असे मृत व्यक्ती चे नाव आहे,

याप्रकरणी पुरुषोत्तम विक्रम शिंगणे (29) रा देऊळगाव मही यांनी देऊळगाव राजा पोलिस चौकीत तक्रार दिली, ते व त्याचा चुलत भाऊ संजय शिंगणे शेतातून घरी येत असताना भीमराव शिंगणे गुरांचे चारा पाणी करून आपल्या घरी येत होते दरम्यान चिखली मार्गावर एम एच 28 एल 7148 क्रमांक च्या दुचाकी ने त्यांना पाठीमागून धडक दिली.

त्यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी भीमराव मृत्यू झाल्याचे सांगितले, दुचाकी देऊळगाव मही येथील मंगेश जगन बकाल चालवत होता. अपघातात तोही जखमी झाला, परंतु घटनास्थळवरून पळून गेला, असे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये