ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्त्याच्या नामफलकाचे म्हाडा कॉलनी असे नामकरण

बरबडी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती संगीताताई शिंदे यांच्या हस्ते अनावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

म्हाडा कॉलोनी,बरबडी येथील रत्नाकर सभागृह समोरील म्हाडा कॉलोनीच्या नागरिकांनी लोकवर्गणीद्वारे नादुरस्त असलेला रहदारीच्या रस्त्याचे जेसीपीने काम करुन स्वच्छ्ता अभियान राबविले आणि या रस्त्याच्या नामफलकाचे म्हाडा कॉलनी असे नामकरण करुन बरबडी ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती संगीताताई शिंदे यांच्या हस्ते अनावरण केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वॉर्ड म्हाडा कॉलनी येथील ग्रा.पं. सदस्य महेंद्र मुनेश्वर, श्रीमती सुलोचनाताई अनकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आला.

म्हाडा कॉलोनी येथील महिला व पुरुष नागरिकांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले .सर्वांचे आभार प्रभाकर पाटील यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये