ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी रवी मेहंदळे सेवानिवृत्त 

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 चंद्रपूर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवी मेहंदळे नियत वयोमानानुसार 31 जानेवारी ला सेवानिवृत्त झाले याबद्दल जिल्ह्यातील कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी यांच्या वतीने जिल्हा व्यवसाय शिक्षण कार्यालय चंद्रपूर येथे 31 जानेवारी 2024 ला शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला

 समारंभाच्या अध्यक्षस्थानी नव्याने रुजू झालेले जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगिरवार उपस्थीत होते

सत्कारमूर्ती रवी मेहंदळे यांनी सांगितले की चंद्रपूर जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षण अधिक रोजगाराभिमुख करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून,किरण मेहंदळे, प्राचार्य

 कल्पना खोब्रागडे ,प्राचार्य आर बी वानखेडे ,प्राचार्य राजेश डांगे प्राचार्य ,गुनानंद वासनिक ,प्राचार्य भालचंद्र रासेकर ,मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा वरोरा, एन एस कीन्नाके,सेवानिवृत्त जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी एस आर भूजाडे उपस्थीत होते. प्रास्तावीक गणेश मिलमिले यांनी केले संचालन शिवाजी महाविद्यालय राजुरा चे प्रा.बी.यू. बोर्डेवार यांनी केले आभार प्रा.शालिक फाले यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये