ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन सेलू येथिल गुन्हे प्रकटीकरण पथकाची दारुबंदी कायद्याअन्वये कारवाई

एकूण 1 लाख 78 हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 05/08/2023 रोजी पोहवा./438 गणेश राऊत यांना मौजा आर्वी(लहान) शेत शिवारातील नाल्याचे काठावर दोन इसम हे हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी क्र. 1 अजय गणेश नान्ने, वय-23 वर्ष, रा. आर्वी(लहान) क्र. 2 रविंद्र शामराव कळमकर, वय-50 वर्ष, रा. सुकळी स्टे. ता.सेलू, जि.वर्धा हे हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून गावठी मोहा दारु 224 लीटर, कच्चा व उकळता रसायन सडवा व ईतर भट्टी साहीत्य असा एकूण जु.कि. 1,78,400/- रु. चा माल जप्त करुन नाश करण्यात आला असून आरोपी नामे आरोपी नामे क्र. 1 अजय गणेश नान्ने, वय-23 वर्ष, रा. आर्वी(लहान) क्र. 2 रविंद्र शामराव कळमकर, वय-50 वर्ष, रा. सुकळी स्टे. क्र. 3 प्रविण आत्माराम थुल, रा. सुकळी स्टे. ता.सेलू, जि.वर्धा, याचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे अप.क्र. 506/23 कलम 65 बी.सी.एफ.83 मदाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू यांचे उपस्थितीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, नेमणुक पोलीस स्टेशन सेलू यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये