ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे 75 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे 75 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या या पर्वाला प्रमुख अतिथी शहरातील प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ञ डॉ. राजलक्ष्मी, नामवंत वकील अॅड. अजित लाभे, शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांकरिता विविध खेळांचे व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पालक प्रत्येक वेळी आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही त्यामुळे अशा वेळी त्यांची उणीव भरून काढतात ते आजी-आजोबा. आई-वडिलांपेक्षाही मुलांना जवळचे वाटणारे आजी-आजोबा लहान मुलांच्या जडणघडणीत खूप मोठी भूमीका बजावतात. आजी-आजोबा हे त्यांच्या जीवनानुभवातून अनेक गोष्टी मुलांना शिकवतात आणि नातवंडाना जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. तेव्हा आजी-आजोबा आणि नातवंडांमधील बंध अधिक दृढ व्हावा या हेतूने या खेळांचे व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सेव्ह द बलून, हिट द बूल्स आय, क्रीष्णा की राधा या खेळांचा समावेश होता.

आतापर्यंत खेळापासून दूर असणा-या आजी-आजोबांनी प्रत्येक खेळात उत्स्फूर्तपणे सहभागी होत खेळाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. आम्ही पुन्हा एकदा बालवयात परतलो, आमच्या आठवणी परतल्या असे वक्तव्य आजी-आजोबांनी केले.

यावेळी प्रमुख अतिथींनी उपक्रमाचे कौतुक करित लहान मुलांना संस्कार शिकवण्यापासून ते त्यांना भावनिक आधार देण्या पर्यंत आजी-आजोबांच मुलांच्या आयुष्यात फार मोलाचं स्थान आहे. तेव्हा अशा उपक्रम व खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रूजवणूक करून आजी-आजोबा व नातवंडामधील नाते अधिक दृढ होईल असे वक्तव्य केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थ्यांसमवेत निलीमा पाऊनकर तर आभार प्रदर्शन शुभांगी वाकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कार्यक्रम प्रमुख रूहीना सैय्यद, पर्यवेक्षक महेश गौरकार, फहीम शेख, वंदना बोरसरे, स्मृती मून, शिल्पा खांडरे तसेच विद्यार्थी मंत्रीमंडळातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये