ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हंसराज अहीर यांनी अयोध्याधामी घेतले रामललांचे दर्शन..!

देशवासीयांना सुख, समृध्दी व निरामय आरोग्य लाभो अशी प्रभु चरणी केली प्रार्थना

चांदा ब्लास्ट

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 25 जानेवारी 2024 रोजी अयोध्येस भेट देवून रामललांचे दर्शन घेतले. देशात परस्पर स्नेह, शांतता व बंधूभाव वृध्दींगत व्हावा तसेच देशवासीयांना सुख, समृध्दी व निरामय आरोग्य लाभो अशी प्रभु चरणी प्रार्थना केली.

दि. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होती त्या ऐतिहासीक सोहळ्याचे निमंत्रण सुध्दा हंसराज अहीर यांना देण्यात आले होते. परंतू या पवित्र सोहळादिनी त्यांच्या कन्येचा विवाह समारंभ असल्याने ते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे दि. 25 रोजी त्यांनी अयोध्येस जावून श्री रामललांचे दर्शन घेतले व पूजा अर्चना केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये