शेडनेट शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांच्या अध्यक्ष खाली बैठक
राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कृषी अधिकाऱ्यांकडून दखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेडनेट धारक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित शेडनेटधारक सीड्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति शेडनेट 50 हजार रुपयाची मदत करावी.या मागणीसाठी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात धडक देऊन तीव्र आंदोलन केले होते. दरम्यान तहसीलदार यांच्या निर्देशावरून कृषी अधिकारी यांनी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली संबंधित शेतकरी, बीज उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची एकत्रित 11 जानेवारी रोजी बैठक आयोजित केली आहे.
गारपिटीने नुकसान झालेल्या शेडनेट धारक शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी संबंधित शेतकरी यांनी आक्रमकपणे तहसीलवर धडक दिली होती.शेडनेट धारक नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेडनेट 50 हजार रुपयाची संबंधित सीड्स कंपन्यांनी मदत करावी,यासाठी तहसीलदार यांच्या दालनात संबंधित सीड्स कंपन्यांचे व्यवस्थापक ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि शेडनेट धारक शेतकरी यांची एकत्रित बैठक लावून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी.अशी मागणी केली होती. दरम्यान सदर आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार यांच्या निर्देशाने तालुका कृषी अधिकारी यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील बिजोत्पादन कंपन्यांचे सर्व प्रतिनिधी, संबंधित शेतकरी आणि आंदोलनकर्ते यांची एकत्रित बैठक 11 जानेवारी रोजी आयोजित केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या हॉलमध्ये सदर बैठक होणार आहे. शेडनेट धारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
राजेश इंगळे, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉ. पा. देऊळगाव राजा.