ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे वतीने पत्रकार दिन साजरा

विविध राजकीय पक्षांनी केला पत्रकारांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके होते.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून सर्व पत्रकार बंधू व भगिनींनी अभिवादन केले.

पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शहरातील विविध राजकीय पक्षांनी सुध्दा पत्रकार दिनी पत्रकारांचा सत्कार केला, माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने आर्या लान्स मध्ये पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने तसेच शरद पवार गटाच्या वतीने व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये