महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे क्रांतीवीर बापूराव शेडमाके जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदुर येथे आज दिनांक 21/10/2014 ला क्रांतीवीर श्री बापूराव शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम, होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे,पर्यवेक्षिका विना देशमुख,एमसिव्हीसी विभाग प्रमुख श्रीमती आरजू आगलावे होत्या या प्रसंगी उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, श्री रोशन मेश्राम, श्री तुकाराम धुर्वे, श्री राकेश आत्राम,श्री सुधीर थिपे या शिक्षकांनी वीर बापूराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. श्री साईनाथ मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणातून क्रांतिवीर श्री बापूराव शेडमाके यांच्या कर्तुत्वाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्येतलाना टिपले यांनी केले, याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.