ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डिजिटल सोल्युशन मधील युवकांची भूमिका बाबत गोविंद पेदेवाड यांचे मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कोरपना तालुकास्तरीय विधी सेवा समिती द्वारा किमान समान कार्यक्रम अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रूपापेठ येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

            या कायदेविषयक शिबिरामध्ये मा. श्री. व्हटकर साहेब तहसीलदार (कोरपना) यांनी तहसील अंतर्गत शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. मा. श्री. पेंदाम साहेब गटविकास अधिकारी (कोरपना) यांनी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. मा.श्री. गोविंद ठाकूर कृषी अधिकारी यांनी कृषी विभागातील विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील शिक्षक श्री. गोविंद पेदेवाड यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवस यावर मार्गदर्शन करताना सांगितले की, डिजिटल युगामध्ये तरुण लोक केवळ तंत्रज्ञानाचे ग्राहक नाहीत तर नवनिर्मिती करणारे आणि निर्माते देखील आहेत. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्यांच्यात आहे. तंत्रज्ञानाची जाण असलेले तरुण वास्तविक जगातील समस्या सोडविण्यासाठी डिजिटल साधनाचा वापर करीत आहेत.त्यामुळे त्यांनी सोशल मीडियाचा वापर गरजेपुरता करावा व डिजिटल तंत्रज्ञानातून शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करावे असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर श्री राठोड सर रूपापेठ यांनी जागतिक आदिवासी दिन यावर मार्गदर्शन केले.

        या कार्यक्रमाला मा. आर .आर. थोरात (अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश प्र. श्रेणी क स्तर कोरपना), मा. व्हटकर साहेब तहसीलदार (कोरपना), मा. पेंदाम साहेब गटविकास अधिकारी , मा. गोविंद ठाकूर कृषी अधिकारी, मा. सचिन कुमार मालवी गटशिक्षणाधिकारी, ॲड.महेश धामोरीकर अध्यक्ष तालुका बार असोसिएशन, ॲड.पवन मोहितकर, श्री. बावणकर सर मुख्याध्यापक शा. माध्य.आश्रम शाळा रूपापेठ, आदी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये