ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गवराळा येथे भक्तिमय, उत्साहात पार पडला जगन्नाथ महाराज सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तारीख सोळा हात जोडा या ब्रीद वचनास पाईक असणाऱ्या भक्तांना जगन्नाथ माऊली कधीही अंतर देत नाही अशी प्रचिती असणाऱ्या विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराजांचा उत्सव गवराळा वार्ड येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळात मोठ्या उत्सवात पार पडला.

जगन्नाथ स्त्री पुरुष भजन मंडळ भद्रावती द्वारे भजन व प्रभोधनातून उपस्थित समुदायाला मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी प्रसिद्ध तरुण व्यावसायिक व समाजशील व्यक्तीमत्वआनंद तागडे यांनी भव्य महाप्रसादाचे आयोजनात विशेष योगदान दिले. मंडळातर्फे जेष्ठ जगन्नाथ भक्त नीलकंठ आत्राम, श्यामराव खापणे, महादेव उरकुडे, बबन जीवतोडे यांचे हस्ते त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

शेकोडो जगन्नाथ भक्तांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्याचे सूत्रसंचालन लिमेश माणुसमारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रभाकर निमकर राजूरकर सर, चव्हाण सर श्यामराव नक्षीने,विलास खापणे, अरुण येरकाडे,सूर्यभान परचाके, पांडुरंग कोयचाडे, बंडू परचाके महादेव डोंगे, प्रवीण निमकर, भोला घाटे, मंगेश येरमे भाऊराव पोहिंनकर,देवराव सातपुते, बाबाराव निखाडे, रामदास एकरे उमेश उरकुडे,विनोद सावंनकर अमोल देठे,व मंडळाच्या सर्व निस्वार्थ सदस्यांनी विशेष सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये