ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन बोलेरो पिकअप मालवाहू वाहनातुन 14 गोवंश जणांवराची सुटका

एकूण किं. 11 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     सविस्तर असे कि, आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे मुखबिरकडुन मिळालेल्या गोपनीय खबरे वरून पो. स्टे. देवळी हद्दीत नाकाबंदी केली असता आरोपी क्रमांक 01 ते 03 यांचे ताब्यातील दोन वाहनात एकूण 14 गोवंश जनावरे ज्यामध्ये 10 बैल, 2 गाय व 2 गोरे असे निर्दयतेने कत्तल करण्याचे उद्देशाने वर्धा जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्याकडे वाहतूक करतांना मिळून आल्याने त्यांचे ताब्यातून वरील नमूद प्रमाणे एकूण जु. किं. 11,80,000/- रु चा मुद्देमाल जप्त करून आरोपीं  1) देवाशीस कैलास मांदळे, वय 23 वर्ष, रा. मुडाणा, तह. महागाव, जि. यवतमाळ, 2) दोषांत अनंता मोडक, वय 24 वर्ष, रा. संत तुकडोजी वार्ड ज्ञानदिप कॉन्व्हेंट मागे हिंगणघाट, जि. वर्धा, 3) अक्षय रामदास नांदुरकर, वय 27 वर्ष, रा. हनुमान वार्ड नं. 03 जाम, तह. समुद्रपुर, जि. वर्धा, 4) अनुप नांदुरकर रा. हनुमान वार्ड नं. 03 जाम, तह. समुद्रपुर (पसार), 5) सादिक शेख रा. हिंगणघाट (पसार), विरुद्ध वरील कलमान्वये पो. स्टे. देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था करिता व वैद्यकीय उपचाराकरिता सर्व गोवंश जनावरांना सर्वोदय चॅरिटेबल गोशाळा, पडेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे, पो.नि.विनोद चौधरी,यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनी. बालाजी लालपालवाले, पो. उपनी. अमोल लगड, स.फो. मनोज धात्रक, पो. हवा. नरेंद्र पाराशर, अरविंद येनुरकर, ना.पो.अं. रवि पुरोहित, रितेश शर्मा, नितीन इटकरे, सागर भोसले, पो.अं. गोपाल बावनकर, संघसेन कांबळे, विनोद कापसे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये