ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धर्मराज कन्या विद्यालय येथे शांताराम पाटील देशमुख यांचे पुण्यस्मरणा निमित्य व्यक्तिमत्वविकास शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तालुक्यातील मोहाडी (मो )येथील प्रियंदर्शनी शिक्षण संस्था संचालित धर्मराज कन्या विद्यालय नवेगावं पांडव येथे संस्थापक अध्यक्ष स्व शांताराम पाटील देशमुख यांचे चतुर्थ पुण्यस्मरणा निमित्य व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका सौ चावरे मॅडम तर प्रमुख अतिथी /मार्गदर्शक सतीश मेश्राम, जनता विद्यालय यांची उपस्थिती होती. यावेळी स्व शांताराम पाटील यांचे प्रतिमेला पुस्पंहार करून दीप प्रज्वलीत करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा /मुख्याध्यापिका सौ चावरे मॅम यांनी स्व शांताराम पाटील देशमुख यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून देत त्यांचा शाळा स्थापने मागचा हेतू समजावून सांगितला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी /मार्गदर्शक सतीश मेश्राम यांनी विद्यार्थीना जीवनात यश मिळावावयाचे असेल तर स्वतःमध्ये आत्मविस्वास कसा निर्माण करावा. तसेच स्मार्ट, शब्दाचा अर्थ, स्मार्ट कसे? बनावे याविषयीं अनेक उदाहरणं देऊन मार्गदर्शन केले. शिक्षणात जी संधी मिळेल त्याचे जीवनात सोने करावे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण पांडव यांनी केले तर संचालन पुरषोत्तम बोरकूटे आणि आभार स्मिता अर्जुनकर मॅडम यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी पुण्यस्मरण कार्यक्रमाला आदरांजली अर्पण केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये