ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देऊळगाव राजाला बहुमान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या श्री क्षेत्र अयोध्या येथील संपन्न होणाऱ्या श्रीरामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता जवळपास 800 लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे, त्या मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 4 लोकांना बोलविण्यात आले आहे.

त्यामध्ये प्रकाश महाराज जंजाळ,हरिचैतन्य महाराज,पळसखेड,धर्मगुरू सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज,पलसिद्ध संस्थान साखरखेडा,व देऊळगाव राजा येथील नरहरी महाराज संस्थान येथील ह भ प श्री उद्बोध मोहननाथ महाराज पैठणकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

संपूर्ण भारतातील विशिष्ट अतिथींना देण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण आल्यामुळे तीर्थक्षेत्र देऊळगाव राजा मध्ये हर्षोल्लास चे वातावरण तयार झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये