ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भन्ते सुरई ससाई यांनी विंजासन बुद्ध लेणीला दिली भेट

बुद्ध लेणी येथे तथागत भगवान बुद्धाच्या मुर्तीची तोड-फोड व विटंबना करणाऱ्या आरोपीचा छडा लावा - भन्ते सुरई ससाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            बुद्ध लेणी येथे तथागत भगवान बुद्धाच्या मुर्तीची तोड-फोड होऊन विटंबना झाल्याची माहिती मिडाल्यामुळे भन्ते सुरई ससाई जपानच्या दोन उपसाकास घेऊन एतिहासिक बुद्ध विंजासन येथील बुद्ध लेणीला भेट दिली. यावेळी नानाभाऊ देवगडे, उमेश रामटेके,सिद्धार्थ सुमन, मनोज मोडक,संतोषभाई रामटेके, लिनता जुनघरे, शशी गायकवाड, मृगन पाटील,प्रवीण कुडवे, शंकर परेकर, धर्मा गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.

         ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्री विंजासन बुध लेणी येथिल फोडण्यात आलेली मुर्ती प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. आरोपीचा शोध लाऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजेत या करिता सनदशीर मार्गाने पाठपुरावे करीत राहा असे त्यांनी या वेळी बोलतांना उपस्थितांना सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये