ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

चंदनखेडा येथील घटना : भद्रावती पोलिसांची कारवाही*

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            तालुक्यातील चंदनखेडा या परिसरात मोठ्या प्रमानांत प्रशासनाचा महसूल बुडवीणारे अवैध रेती तस्कर सक्रिय झाले असुन रेती वाहतुकीची चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भद्रावती पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चंदनखेडा येथे दोन ट्रैक्टर अवैध रेती वाहतुक करीत असल्याचे आढळुन आले असता ते दोन्ही ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे.

            प्राप्त माहिती नुसार, दि. 11 जानेवारीला रात्री 1 वाजताचे दरम्यान चंदनखेडा परिसरात अवैध रेती वाहतूक करीत असल्याची माहिती मीडाली. सदर पोलिसांनी चंदनखेडा परिसरात दोन अवैध रेतीचे ट्रैक्टर जप्त केले असुन चंदनखेडा येथील दोन्ही ट्रॅक्टर मालकांवर भद्रावती पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई भद्रावती पोलीस स्टेशन चे ठाणेदार बिपिन इंगळे यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये