ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुध निर्माणी येथे कामगारांचे साखळी उपोषण

नवीन पेन्शन योजनेचा विरोध व जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

             आयुध निर्माणी चांदा येथे आयुध निर्माणी कामगार युनियन सलग्न हिंद मजदूर सभा (एचएमएस)यांच्या आदेशानुसार 10 जानेवारीला आयुध निर्माणी चांदाच्या कर्मचार्यांचे साखळी उपोषण आंदोलन निर्माणिच्या गेट नंबर 3 समोर सुरू केले. नवीन पेन्शन योजना योजनेच्या विरोधात आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आयुध निर्माणी चांदाच्या कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

   या आंदोलनात युनियनचे अध्यक्ष अभयसिंग चंदेल, कार्याध्यक्ष विशाल रामटेके, सहसचिव रवी खामनकर जेसीएम सदस्य विवेक वाढई, पप्पू गेडाम ,आणि रवी जीवतोडे,मल्लेश, आनंद वरगंटीवार राकेश पवार, प्रशांत झाडे, अविनाश शिर्के, राकेश मोहूर्ले ,मुकेश मेश्राम ,राजनसिंग तोमर ,शैलेश लांडगे, सुनिल वैद्य, मनोज वैद्य हे साखळी उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये