ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी

बेलदार समाज सावलीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

     बेलदार समाज सावलीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मा.सा.उर्फ दादासाहेब कन्नमवार यांची १२४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम दादासाहेब कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सावली नायब तहसीलदार राजेंद्र मंथनवार हे होते,तर अध्यक्ष म्हणून प्रभाकर गाडेवार यांनी मा.सा.उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.प्रमुख अतिथी म्हणून विजयभाऊ मुत्यालवार,अशोकआकुलवार,प्रकाशभाऊ जक्कुलवार पत्रकार प्रकाश लोनबले,पत्रकार शेखर प्यारमवार हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सुधाकर गाडेवार यांनी केले तर आभार नरेंद्र जक्कुलवार यांनी मानले.जयंती कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये