ताज्या घडामोडी

नायलॉन मांजा विक्रेते व वापरकर्त्यांवर थेट गुन्हे नोंदविणार – जिल्हा पोलिस अधीक्षकांचा इशारा

जिल्ह्यात यंदा 8 गुन्ह्यांची नोंद

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

नायलॉन मांजा वापरने हा घातक असल्याची महिती असुनही मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभुमीवर पतंग उडवितांना प्रतिबंधीत नायलॉन मांजाचा उपयोग/वापर केल्यामुळे संपुर्ण देशातील विविध राज्यातील अनेक भागात नायलॉन / चायनीज मांजा मध्ये अडकुन अनेक मानवी जिवीतास व पक्ष्यांचा घात होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.

रस्त्यावर आवागमन करतांना तसेच नोकरीवर किंवा इतर तत्सम कामांसाठी घरुन मोटार सायकल वर निघालेल्या चालकांच्या तसेच दुचाकीवरील नागरिकांच्या गळयात मांजा अडकल्यामुळे त्यांच्या गळ्याची नस कापल्या गेल्याने त्यांना आपला जिव गमवावा लागण्याच्या घटना दरवर्षी उघडकीस येतात त्यामुळे मानव व पक्षी/प्राणी ह्यांच्या जिवीतास धोकादायक ठरणाऱ्या प्रतिबंधीत नायलॉन / चायनिज मांजा विक्री व खरेदी करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

जिल्हयातील नागरीकांना पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येते की, जो कोणी धाउक/किरकोळ व्यापारी नायलॉन मांजा बाळगतांना किंवा विक्री करतांना किंवा साठवणुकदार आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील पोलीस हेल्पलाईन 112 वर तात्काळ संपर्क करुन त्याबाबतची माहिती दयावी.

चंद्रपूर जिल्हयात यावर्षी सन 2024 मध्ये आज पावेतो पोलीस स्टेशन भद्रावती, दुर्गापूर, राजुरा (स्थानिक गुन्हे शाखा), चंद्रपूर शहर, ब्रम्हपुरी, रामनगर, घुग्घुस, बल्लारशाह अंतर्गत एकुण 8 गुन्हयाची नोंद करुन एकुण रुपये 74370/- रुपयाचा नायलॉन प्रतिबंधीत मांजा जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये