ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे कविता पठण व कथाकथन स्पर्धेचे आयोजन..

चांदा ब्लास्ट

शालेय जीवनात मुलांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासाकडे खुप लक्ष दिल्या जाते. पाठांतर केल्याने मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळते व केलेल्या पाठांतराचे प्रस्तुतीकरण मुलांना करता यावे यासाठी चांदा पब्लिक स्कूल येथे पुर्व प्राथमिक विभागातर्फे कविता पाठांतर व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाला स्पर्धा निरीक्षक म्हणून सौ. अंजली उत्तरवार, सेक्रेटरी ऑफ इनरव्हील क्लब, चंद्रपूर आणि सौ. वृषाली डेकाट, युथ डायरेक्टर, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर लाभल्या. स्पर्धेत नर्सरीच्या चिमुकल्यांनी इंग्रजी कविता पाठांतर करून साअभिनय त्याचे सादरीकरण केले तसेच एल.के.जी. व यु.के.जी. च्या चिमुकल्यांनी कथेचे प्रस्तुतीकरण केले.

कथेचे प्रस्तुतीकरण करीत असतांना त्यांच्या चेह-या वरील हावभाव व त्यांच्या आवाजातील चढउतार पाहून कार्यक्रमाला उपस्थित निरीक्षक तसेच शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी मुलांचे तोंड भरून कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी मुलांचे प्रस्तुतीकरण व त्यांचे मंचावरील धाडस पाहुन त्यांचा उत्साह वाढवला.

ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका मंजुषा नवरखेले व रिना शाहा यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका श्वेता मच्छा यांनी केले. विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आपले मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये