ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेगांव येथे परिवर्तन प्रकल्प हस्तांतरण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

           तालुक्यातील शेगांव येथे कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर द्वारा hdfc अर्थ सह्यायित परिवर्तन आदिवासी विकास प्रकल्प हस्तांतरण सोहळा संपन्न झाला.

या कार्यकामाचे अध्यक्ष श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय अधिकारी वरोरा, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पवन डोंगरे, hdfc बँक,धनंजय लंबोरे व्यवस्थापक hdfc बँक शाखा वरोरा,श्री योगेश कौटकर तहसीलदार वरोरा, अमित नाफडे ceo कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर,विजय काळे,कृषी मंडळ अधिकारी वरोरा, सुधीर नन्नावरे, अध्यक्ष वनधन कृषी विकास fpo सालोरी,उपस्थित होते.

कार्यकमाचे प्रास्ताविक अमित नाफडे यांनी केले.शिवनंदा लंगडापुरे यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रास्थानी ठेवून बचत गट, शेतकरी, आदिवासी क्षेत्रात रोजगार निर्मितीचे कार्य कृषी विकास संस्थेने केलेअसे सांगितले.विजय काळे यांनी शेगांव परिसरातील शेतकऱ्यांचे व कृषी विकास संस्थेचे कौतुक केले. स्मार्ट बाबत सविस्तर माहिती दिली.

पवन डोंगरे यांनी परिवर्तन प्रकल्प बाबत माहिती दिली.वन उपजत बचत गट अर्जुनी यांना 28,000 रुपये धनादेश देण्यात आला. गौरवी महिला बचत गट महालगाव यांना 10,000 रुपये धनादेश प्रधान करण्यात आले.सूत्रसंचालन नीलम क्षीरसागर, व्यवस्थापक परिवर्तन प्रकल्प शेगांव,यांनी केले.तर श्रीपत पाटील, पाणलोट तज्ञ यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश पाटील, सुनील बावणे, सिद्धार्थ तायडे, वाडी समितीचे सर्व, अधिकारी,सदस्य इत्यादीनी सहकार्य केले.तसेच brlf चे सर्व अधीकारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये