ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण

कार्यक्रमात जीवन गौरव व वरोरा भूषण पुरस्कार वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.राजेंद्र मर्दाने

           पत्रकार दिनानिमित्त वरोरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने संघांच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा ६ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता जुनी नगर परिषद येथे आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रतिभा धानोरकर भूषविणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, वरोरा न.प. मुख्याधिकारी तथा प्रशासक गजानन भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

          याप्रसंगी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य राजाभाऊ लोणारकर यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच वरोरा शहराच्या लौकिकात भर घालणारे आदित्य जिवने (भाप्रसे ), सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना वरोरा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवडून आलेले बाळू भोयर, पत्रकार यांचाही सत्कार याप्रसंगी आयोजित केलेला आहे.

        पत्रकार संघाचे सदर कार्यालय हे वरोरा तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना, संस्था आणि सर्वसामान्य व्यक्तींना पत्रकार परिषदा घेण्याकरिता विनामूल्य उपलब्ध असणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये