ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत लालगुडा शाळेच्या चिमुकल्यांचा द्वितीय क्रमांक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना : स्टुडन्ट फोरम ग्रुप कोरपना द्वारा आयोजित तालुकास्तरीय शैक्षणिक व सांस्कृतिक महोत्सव २०२३ भव्य खुल्या समूह नृत्य स्पर्धेत गडचांदूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

         स्टुडन्ट फोरम ग्रूप कोरपना द्वारा आयोजित तालुकास्तरीय शैक्षणिक व सांस्कृतिक महोत्सव 2023 तिसरा दिवस दि.२४ डिसेंबर ला नृत्य स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच सर्वांसाठी खुले रंगमंच म्हणजेच स्टुडन्ट ग्रुप द्वारा आयोजित महोत्सवामुळेच अशा प्रकारची व्यासपीठ उपलब्ध झाल्याचा आनंद सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गोंडी नृत्य सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.या स्पर्धेचे उपविजेता पारितोषिक संपादन करून आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव लौकिक केले याबद्दल गावकऱ्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला.

        यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संजयभाऊ धोटे, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष, चंद्रपूर देवराव भाऊ भोंगळे तथा आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे आणि शिक्षक गोविंद पेदेवाड यांचे मनापासून कौतुक केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये