ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड पोलीस स्टेशन येथे अनैतिक घटनामध्ये वाढ

गुन्हेगारी कमी करण्यासाठी कायद्याने वचक ठेवावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव, कोटगाव व मेंढा येथे अपहरण, आमिष आणि फुसलावून नेण्याचे घटनात वाढ झाली असल्याचे पोलीस स्टेशन येथील नोंदीवरून दिसून येत आहे. नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव खुर्द येथे ५२वर्ष नराधामाने सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केले तर ९सप्टेंबर रोजी कोटगाव येथील मुकी असलेल्या तरुण मुलीचे अपहरण करून तिचेवर अत्याचार केल्याचे समजते.

दोन्ही घटनेत आरोपीना अटक केली गेली असून पोलिस अधिकचा तपास करीत असताना आज दोन मैत्रिणी मेंढा येथून ब्रम्हपुरी येथे जात असताना एका मैत्रिणीने तिला सोडून पळून गेली असल्याची तक्रार देण्यात आली आहे यामुळे या तीन, चार दिवसात अनैतिक घटनात वाढझाली असून पोलिसांनी आपला कायदेशीर वचक ठेऊन धाक निर्माण करावा जेणेकरून अशा घटनाना आळा बसेल आणि गुन्हेगारी कमी होईल यासाठी पोलीस विभागाने दक्ष असण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये