ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांच्या दुर्लक्षित पणामुळे ट्रकच्या धडकेत युवकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर- शहरातील संविधान चौक, बसस्थानक जवळ धावत्या ट्रकने( MH 40 CM 9097)मोटरसायकला (MH 34 BQ 5414)धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. मारोती सुरेश डोईफोडे (28) रा. विसापूर ( तिनगुडा) असे मृतकाचे नाव आहे.

         संविधान चौक, बसस्थानक परिसरात नेहमीच वर्दळ असते. या परिसरात शाळा, महाविद्यालयामध्ये शिकणारी विद्यार्थी सकाळी व सायंकाळी शाळेत येणे- जाणे करिता एस. टी. बस, ऑटो ची वाट पाहत असतात. शहराततील या परिसरात आजूबाजूला बाजारपेठ असल्यामुळे परिसरातील अनेक लोक शहरात येत असतात.

त्यामुळे नेहमीच तिथे वर्दळ असते. या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने अनेक वाहन धावत असतात. त्यामुळे या वर्दळीवर व वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी कायम स्वरूपी वाहतुक पोलीस असणे आवश्यक आहे. कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नसल्यामुळे आज एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. संविधान चौक, बसस्थानक परिसरात कायमस्वरूप वाहतूक पोलिसाची मागणी नागरिक करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये