ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुड मॉर्निंग ग्रुप,गडचांदुरने दिला आरोग्य व स्वच्छता संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     एकविसाव्या शतकात मानवी जीवन एवढे संघर्षमय झाले आहे की, स्वतः ची काळजी घ्यायला वेळ नाही,या गतिमान व वैज्ञानिक दृष्टिकोनवादी जीवनात माणूस, माणूस एकमेकांना समजून घेण्यासाठी कमी पडत आहे.तरीही जो वेळ मिळतो त्या, क्षणांचा योग्य उपयोग घेण्यासाठी नववर्षाचे स्वागत गुड मॉर्निंग ग्रुपने, विदर्भ मैदानावर रोज सकाळी, नोकरीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या तरुणांना मैदान सराव करतांना जे, व्यत्यय येतो, त्याला दुर करण्यासाठी, सर्व स्तरातून, प्रत्येक क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी, परिसरातील शिक्षक, उद्योजक व इतर कर्मचारी एकत्र येऊन आरोग्याचा,स्वच्छतेचा,मानवतेचा संदेश व राष्ट्रीय एकता जोपासण्यासाठी एकत्रित येऊन गुड मॉर्निंग ग्रुपने सकाळी विदर्भ मैदानावरील केरकचरा, फुटलेल्या काचा,काटे उचलुन मैदानाची स्वच्छता केली.

  दररोज सकाळी विदर्भ मैदानावर एकत्रित येणारे समविचारी यांच्या संकल्पनेतून गुड मॉर्निंग ग्रुपची स्थापना ०१/०१/२०२४ रोजी सामाजिक बांधिलकी व आरोग्य संदेश देण्यासाठी व जनजागृतीसाठी केली आहे. यामध्ये रोज सकाळी योगा, प्राणायाम व मनोरंजन खेळ, विविध सामाजिक बांधिलकी जपनारे उपक्रम,मानवी जीवन,कसे सुखकर होईल त्यासाठी गुड मॉर्निंग ग्रुप कार्य करत आहे.यामध्ये ६५ लोक एकत्रित येऊन गुड मॉर्निंग ग्रुप गडचांदुर मध्ये सक्रिय सहभाग घेऊन दुरदृष्टीने काम करत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये