ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शामराव पवार यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड

यावेळी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती तालुक्यातील आसापूर येथील तंटामुक्त अध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया २० ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत आसापूरचे सरपंच मंगेश सोयम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये शामराव पवार यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या ग्रामसभेत गावातील ग्रामस्थांनी एकमताने गावातील प्रतिष्ठित नागरिक शामराव पवार यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. स्व. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील कामाचा ताण कमी तसेच गावातील किरकोळ भांडणे गावातच मिटावीत यासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आज पर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावांत तंटामुक्ती झालेली आहे. तंटामुक्ती अध्यक्ष शामराव पवार यांची निवड झाली त्याबद्दल ग्रामपंचायत कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी, उपसरपंच लचु सोयाम, सचिव कुरुडे, जय विदर्भ पार्टीचे सुदाम राठोड, वामन पवार,जिजाबाई चव्हाण, लक्ष्मीबाई राठोड, माधव सोयम, नामदेव राठोड, किसन जाधव, प्रकाश राठोड, रमेश पवार, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये