ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा बस स्टॉप येथे हिट अँड रन कायद्याविरोधात चक्का जाम आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

केंद्र सरकारने वाहन चालकाच्या विरोधात हिट अँड रन केलेल्या कायद्यामुळे कोरपणा बस स्टॉप येथे छत्रपती शिवाजी महाराज कोरपणा येथे 2/1/2024 मंगळवार ला सकाळी कोरपना तालुक्यातील सर्व चालक मालक यांनी राजुरा ते आदिलाबाद व वनी येणारे सर्ववाण बंद केले व बंद ला चालक-मालक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला संघर्ष वाहन चालक मालक संघटना यांनी कोरपणा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यापूर्वी वाहन अपघात जामीन मिळत होता आता सरकारने 10 वर्ष शिक्षा व जुर्माना ठेवण्यात आला आहे ,अपघात हा कोणत्याही वाहन चालक मुद्दाहून करीत नाही अपघात हे नजर चुकीने होतात अपघात झाल्यास चालकास पब्लिक मारहाण या भीतीमुळे तेथून चालक पळून जातात त्यामुळे चालकास इतकी मोठी शिक्षा देणे त्याच्यावर अन्यायकारक ठरेल, म्हणून केंद्र सरकारने घेतलेला ट्रेन कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा जर हा कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कोरपणा तालुक्यातील सर्व चालक मालक यांच्याकडून देण्यात आला, यावेळी कोरपना पोलीस स्टेशन यांनी बस स्टॉप येथे खडक बंदोबस्त ठेवण्यात आला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये