ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मनोज सेवा हीच खरी ईश्वर सेवा

तुषार देवढे शिवसेना कट्टर समर्थक उद्धव साहेब ठाकरे गट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 30 /31 /20 23 रोज शनिवार सकाळी 11 वाजता माननीय अरविंद सावंत साहेब माजी केंद्रीय मंत्री तथा पश्चिम विदर्भ शिवसेना नेते लोकसभा वर्धा जिल्हा यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे कट्टर समर्थक तुषार देवढे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे नेतृत्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी तथा शिवसैनिक तसेच परिसरातील नागरिकांना महिलांना घेऊन शारदा मूकबधिर विद्यालय नालवाडी वर्धा, तुकडोजी अंध विद्यालय नलवाडी वर्धा, उषाकाल बाल सदन नलवाडी, श्री छाया बालगृह नालवाडी वर्धा श्री छाया बालगृह नालवाडी वर्धा या ठिकाणी चारही शाळेतील मुलांना घेऊन जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच परिसरातील नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात आले व शाळेतील प्रांगणात हनुमान मंदिरामध्ये आंबा फणस अशोक वड पिंपळ ळ या जातीचे पाच झाडे लावण्यात आली व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शारदा सांस्कृतिक मंडळाच्या उषाताई फाले मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या, आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा ताई परिवार तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजक तुषार देवडे, शिवसेनेचे किशोर भाऊ धोंगडे, संस्थेचे सचिव लक्ष्मीकांत चापले, कोषाध्यक्ष रमेश मानकर, उपाध्यक्ष वैभव फा ले,श्री प्रमोद पांडे, अर्चना देवडे, शुभांगी चौधरी मंचावर उपस्थित होत्या,

सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या हाताने आदरणीय अरविंद सावंत साहेब यांचे वाढदिवसाचा केक कापून बालकांना वाटप करण्यात आला, विद्यार्थ्यासोबत जेवण करून, वृक्ष वाटप वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये तुषार देवढे यांनी सामाजिक कार्य ,जनसेवा करण्यासाठी युवकांनी मदत करावी व समाजातील चौथ्या घटकाला पिढीत शोषितांना आपल्या जवळील असलेल्या समर्थनिशी क्रीडा स्पर्धाआरोग्य मातृशक्ती रक्षण वृक्षारोपण अन्नदान रक्तदान थोर पुरुषांच्या जयंती जनहितार्थ आंदोलन इत्यादी बाबी करण्याविषयी प्रेरित केले.

शिवसेना नेहमी 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण हे वंदनीय हिंदुरुदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य जोपासून गेली कित्येक वर्षापासून शिवसैनिक करीत आलेला आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आदरणीय अरविंद सावंत साहेब माजी केंद्रीय मंत्री तथा नेते पश्चिम विदर्भ, यांचे मार्गदर्शनात वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख जिल्ह्याची धुमाळ, विधानसभा संपर्कप्रमुख उत्तम यांच्या सूचनेवरून वर्धा जिल्हा शिवसेना आपले कार्य चौक पणे प्रचार व प्रसार माध्यमातून करीत आहे. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असा विचार अंगीकृत धरून आपण कार्य करून शिवसेनेचा डंका व बोलबाला समाज मनावर बिंबविला पाहिजे त्यातून आपले लोकप्रतिनिधी तयार होतील या निश्चितच शंका नाही असे विचार तुषार देवढे यांनी व्यक्त केले संस्थाचालकांनी आदरणीय उषाताई पाले यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन पर भाषण करून साहेबांच्या नावाने वाढदिवसानिमित्त आमच्या संस्थांमध्ये वृक्षारोपण अन्नदान वृक्ष वाटप कार्यक्रम घेतल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले तसेच साहेबांच्या नावाने वाढदिवस पर शुभेच्छा पत्र लेखी देऊन साहेबांना आमच्या प्रतिष्ठान मध्ये घेऊन येण्याचे निमंत्रण तुषार देवढे यांना दिले.

भविष्यात आम्ही आपल्या संस्थेला शिवसेना वर्धा जिल्ह्यातर्फे सामाजिक सेवेच्या माध्यमातून मदत करू असे अभि वचन शिवसैनिकांनी दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता अशांक कावळे, मनोज यात्रा, गौरव भिलाये निलेश मिश्रा नाना जांभुळकर भुरी भाई अरखेल प्रमोद पाटील हिमांशू छगनकर प्रवीण आवारे श्री कांबळे काका प्रसाद आखाडे पिंटू लांडगे राजू पेटकर राजूभाऊ शेंगदाणे वाले प्रीती परिवाल आशाताई मानकर श्री नाखाडे सर, सचिन देवढे, नंदाताई मुंडे, मला ताई तुरंन कर, सुरेखा नंदेकर, विद्याधर नांदेकर, अशोक भाऊ बेलखोडे आदी शिवसेना कार्यकर्त्यांनी मदत केली. श्री नानाभाऊ जांभुळकर यांनी गुरुदेव प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये